इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे अथक प्रयत्न आणि लायन्स क्लब जुहू यांच्या सहकार्याने इगतपुरी तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहीका आज लोकार्पित करण्यात आली. मोडाळे येथे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सोपवली. ह्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातल्या तळागाळातील गोरगरीब नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळण्यास बहुमोल हातभार लागणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी गोरख बोडके यांच्या कार्याचे कौतुक केले. लोकार्पण कार्यक्रमावेळी विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, संचालक सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णवाहीकेचा फायदा इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना मिळणार असून यामुळे अनमोल जीव वाचवण्यासाठी योगदान मिळणार आहे. याबद्दल गोरख बोडके आणि लायन्स क्लब यांचे विशेष कौतुक विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group