प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेतर्फे ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन कार्यपूर्तीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्थेचे सचिव ज्योती कोल्हे, मुख्याध्यापिका सुरेखा आवारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह वाडीवऱ्हे परिसरातील एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नाशिकला सुद्धा ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.त्यात चित्रकलेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुकणे महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयातील विद्यार्थी सार्थक गोकुळ शिरसाठ यास मिळाला. त्यास त्याला गोवर्धने विद्यालयाचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. महात्मा गांधीच्या विचाराचे ग्रामीण आणि गांधीच्या चष्म्यातून दिसणारा भारत, विश्वगुरू भारत, उद्याचा वैज्ञानिक भारत असे अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांनी चित्रे कागदावर रेखाटून सुंदर रंगकाम करीत चित्रकला स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कला शिक्षक रोहित पगारे यांनी काम केले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group