छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आहुर्ली येथे उत्स्फुर्त स्वागत

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे वतीने नाशिक जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे आहुर्ली येथे आगमन झाले होते. यात्रेचे उत्स्फुर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले. आहुर्ली येथे माजी चेअरमन तथा पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्यासह शिवसेनेचे शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष सोमनाथ पुंजा पा. जाधव, भाजपचे युवा नेते भाऊसाहेब काशिनाथ पा. गायकर , वैभव रोहिदास गायकर, गणपत मांगटे, प्रा.गणपत पवार, शिवराम गोवर्धने आदी असंख्य नागरिकानीं उपस्थित राहून या शौर्य जागरण यात्रेचे स्वागत केले. यात्रेप्रसंगी कु्. तृप्ती गायकर, अलका मधुकर खकाळे आदी युवती व महिलानीं शिवप्रतिमेचे पुजन करुन औक्षण केले. यात्रेचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद नाशिकचे मंत्री ( ग्रामिण ) तथा जिल्हाध्यक्ष प्रा. हभप देविदास महाराज वारुंगसे यांनी केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झालेले होते. लाखो वर्षाची परंपरा हिंदु सनातन धर्माला आहे. या परंपरेत शौर्याला महत्त्वाचे स्थान असुन, शौर्याचा इतिहास आहे. परंतु सध्याच्या युगात हिंदु सनातन धर्मियानां आपल्या वैभवशाली शौर्य परंपरेचा विसर पडलेला आहे. यात्रेच्या निमित्ताने या शौर्य परंपरेची नव्याने आठवण करुन देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. हभप देविदास महाराज वारुंगसे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!