इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रतिष्ठानच्या इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराचे वितरण लक्ष्मी लॉन्स गोंदे दुमाला येथे संपन्न झाले. हा कार्यक्रम अभिनेते किरण भालेराव, आमदार हिरामण खोसकर, माजी नगरसेवक दिनकर पाटील, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, माजी नगरसेविका अर्चना जाधव, जिल्हा संघटक भागिरथ मराडे, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, प्रा. प्रकाश कोल्हे, प्रा. गोपाळ मोजाड, रमेश खांडबहाले, भाऊसाहेब शेलार, पत्रकार भास्कर सोनवणे, शरद मालुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन ठरल्याने विद्यार्थ्यांमधे उत्साह आला. इगतपुरी रत्नगौरव पुरस्कारामध्ये आदर्श डॉक्टर प्रशांत मुर्तडक, आदर्श वकील ॲड. बी. डी. खातळे, समाजसेवक गणेश मुसळे, आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर भोईर, आदर्श महिला मधुरा जाधव, आदर्श क्रीडापटू पांडुरंग जुंद्रे व सुजाता भोर, आदर्श शेतकरी समाधान गुजाळ, नंदू गावडे, नाना जाधव, आदर्श पत्रकार के. टी. राजोळे, वाल्मीक गवांदे, संदीप कोतकर, विकास काजळे, शैलेश पुरोहीत, उद्योजक किरण भोसले, वारकरी संप्रदाय अशोक महाराज धांडे, पंढरी महाराज सहाणे, सोनाली बोराडे यासह पोलीस आर्मीमध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन प्रा. प्रकाश कोल्हे व गोपाळ मोजाड यांनी केले. नंतर १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यात २३७ विद्यार्थी सहभागी झाले होते. राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी सुंदर नियोजन केल्याने त्यांचे कौतुक झाले. ॲड संदीप शेलार, सरपंच अर्जुन भोर, रमेश सहाणे, शिवाजी मते, शरद मते, तुकाराम वारघडे, सागर नाठे, संदीप बिन्नर, बाळासाहेब भगत, किसन शिंदे, एकनाथ गायकर, बाजीराव गायकर, हिरामण शेजवळ, संदीप पागेरे, कैलास फोकणे, विक्रम डावरे, रावसाहेब मते, तुकाराम काजळे, संदीप काजळे, संपत मते, दशरथ पागेरे, अरूण गायकर यांच्यासह राजयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश मुसळे, वैभव दातीर, ईश्वर गवते, समाधान शिंदे, यश ठोके, वैभव मुंढे, शुभम गवते, सागर मते, चेतन सहाणे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रस्तावना आत्माराम मते यांनी केली तर सुत्रसंचालन विजय कर्डक यांनी केले.