इगतपुरीनामा न्यूज – भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा प्रसिद्धीप्रमुख आकाश भले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी इगतपुरी तालुक्यातील निरपण, बोर्ली, कुरुंगवाडी, पिंपळगाव, शेनवड बुद्रुक ह्या ५ गावांसाठी १२ हजार ६० झाडे मंजूर झाली आहेत. ह्या हरियाली प्रकल्पांतर्गत भरवज निरपण येथे वृक्ष वाटप कार्यक्रम आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमार्फत यश फाउंडेशनच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण येथील ३१० शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करण्यात आली. महिंद्रा इगतपुरीचे प्लांट हेड खानोलकर, जयंत इंगळे, पोलीस मुख्यालय नाशिकचे ट्राफिक हेड प्रविण पाटील, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, विजय तिदमे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा प्रसिद्धीप्रमुख आकाश भले, भरवज निरपणच्या सरपंच जाईबाई भले यांच्या हस्ते झाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच शारदा साळवे, ग्रामपंचायत सदस्य अजय भले, गणेश नाडेकर, कल्पना भले, ताराबाई डिघे, माजी सरपंच प्रकाश भले, सामाजिक कार्यकर्ते वाळू भले, आनंद साळवे, मुख्याध्यापक दगडूसिंग परमार, शिक्षिका मंगल कदम, सुनंदा सांगळे, मीना ठोके, गोरख भले, किसन घारे, मयूर तिटकरे, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा प्रसिद्धीप्रमुख आकाश भले यांच्या सहकार्याने यापुढेही विविध सामाजिक उपक्रम ह्या भागात राबवण्यात येतील असे उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group