इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
सर्वत्र दररोज हादरा बसवणारी रुग्णसंख्या पाहून नागरिकांच्या मनात धसका बसत असतांनाच इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपासून दिलासा देणाऱ्या बातम्या येत आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी 39 कोरोना बाधित रुग्ण आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज सायंकाळी 5 वाजे पर्यंतच्या अहवालानुसार 36 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आता फक्त 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महसूल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा कोरोना उच्चाटन करण्यासाठी डोळ्यांत तेल घालून काम करीत आहे. नागरिकांनी शिस्त पाळून कोरोना रोखण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन तालुका संपर्क अधिकारी तथा जिल्हा शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी केले आहे.
घोटी शहरात जनता कर्फ्युला उदंड प्रतिसाद लाभला असून इगतपुरी शहर, ग्रामीण भागातील गर्दीचे चित्र पालटून गेले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमालाही अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. न चुकता पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे. लस अतिशय सुरक्षित असून कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008