![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2023/07/wp-1688872592016-1024x571.jpg)
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तुपादेवी फाटा येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या तर्फे आज बेजेगाव ता. त्र्यंबकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. संजय भोसले, डॉ. प्रियंका साबणे, आरोग्यसेविका पूजा मोरे, अश्विनी बोडके, आरोग्यसेवक योगेश पवार यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी स्वामी श्रीकंठानंद तसेच हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा कुलकर्णी उपस्थित होत्या. स्वामीजींनी ग्रामस्थांशी संवाद साधत आरोग्य जपून निरामय आरोग्य धारण करण्याबद्धल सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराच्या आयोजनात बेजे येथील सरपंचांनी उपस्थित राहून सहकार्य केले.