शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद : राजेंद्र अहिरे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

लॉकडाऊन काळात राज्यातील शिक्षक एकत्र येत ‘शिक्षक ध्येय’ नावाने साप्ताहिक सुरू करावे हे कार्यच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नाशिकच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले.
राज्यातील शिक्षकांतर्फे प्रकाशित होत असलेल्या शिक्षक ध्येयच्या प्रथम वर्धापन दिनाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षकांना या निमित्ताने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी त्यांनी शिक्षकांना केले.
20 एप्रिल 2020 ला डिजिटल साप्ताहिक शिक्षक ध्येयचे ऑनलाईन प्रकाशन दै. सकाळचे तत्कालीन संपादक श्रीमंत माने यांचे हस्ते झाले होते. दि. 30 सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक ध्येय डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण दै. सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांचे हस्ते झाले.
वर्षभरात 50 अंक नियमित प्रकाशित करून त्यांचे 334 व्हाट्सएप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम तसेच संकेतस्थळाच्या माध्यमांतून सुमारे तीन लाख शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हे साप्ताहिक नियमित पोहचत आहे. शिक्षक ध्येयचे राज्यात 92 शिक्षक प्रतिनिधी कार्यरत आहेत, असे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार यांनी सांगितले.

Similar Posts

Comments

  1. avatar
    Vrushali Prakash Ghodake says:

    Very nice work in Lockdown. From Shikashak Dheyay we have got better direction for our school work.

Leave a Reply

error: Content is protected !!