इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या शेतकरी विकास पॅनेलच्या १८ उमेदवारांना बाजार समितीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन शेवगेडांगचे माजी सरपंच साहेबराव उत्तेकर यांनी केले आहे. शेवगेडांग, म्हसुरली, सांजेगाव, सांजेगाव, आवळी, कुशेगाव, मोडाळे, शिरसाठे, वैतरणा, धारगाव आणि तालुकाभरात त्यांनी मतदारांची भेट घेत आवाहन केले. २८ एप्रिलला होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व वाढत असून अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांचे सक्षम नेतृत्व आहे. म्हणूनच पॅनेलच्या १८ उमेदवारांना मतदारांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे. दांडगा जनसंपर्क असलेले शेवगेडांगचे माजी सरपंच साहेबराव उत्तेकर हे कायमच शेतकरी विकास पॅनलसोबत असून त्यांनी या सक्षम १८ उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी सरपंच उत्तेकर त्यांच्याबरोबर प्रतिष्ठित नागरिक सुरेश पोरजे, आनंदा शिंदे, भास्कर पोरजे, नामदेव पारधी, बाळासाहेब राऊत, कैलास शिंदे, रामदास शिंदे, भीमा चहाले, अशोक शिद, विश्राम पोरजे, धनराज पोरजे, योगेश भरीत, रोहिदास भरीत, दौलत काका गोरे, खंडू भवारी, बुगा पारधी, भैरव धुमने आदींनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता कपबशी या चिन्हावर ठसा मारून शेतकरी विकास पॅनेलला विजयी करा असे आवाहन माजी सरपंच साहेबराव उतेकर यांनी केले आहे. सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव हे १८ उमेदवार आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group