इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचा दूर दृष्टिकोन, व्यापक शेतकरी हित आणि सामान्य जनतेच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी असणारे अभ्यासू उमेदवार लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये उमेदवारी करीत आहेत. ह्या सर्व १८ उमेदवारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घोटी बाजार समितीला दिशादर्शक विकास साधता येईल. म्हणून इगतपुरी तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे संचालक मतदार, ग्रामपंचायत सदस्य मतदार, व्यापारी आणि हमाल बांधव मतदारांनी ह्या सर्व १८ उमेदवारांच्या हातात बहुमताने सत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वसमावेशक विचारांचा पगडा असणारे नेते पॅनलचे नेतृत्व करीत आहे. बाजार समितीच्या निकालाच्या दिवशी १८ विजयी उमेदवारांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. म्हणून मतदारांनी विजयाचे साक्षीदार व्हावे असे प्रतिपादन इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक सोसायटीमध्ये १८ उमेदवारांचा नेहमीच संपर्क असून निवडणुकीच्या निमित्ताने भेटीगाठी घेऊन पॅनलची भूमिका समजाऊन सांगितली जात आहे. मतदारांशी बोलल्यानंतर सर्वांनी कपबशी निशाणी चांगली लक्षात ठेवली आहे. मतदानाच्या दिवशी आमचे मतदान ह्याच निशाणीवर करून आम्ही विजयाचा गुलाल उधळू असे आम्ही प्रचारात अनुभवत आहोत. म्हणून शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांचा विजय आजच निश्चित मानला जात असल्याचे शिवराम झोले म्हणाले. सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली असून हे सर्व विजयी होतील असे त्यांनी शेवटी सांगितले.