जिंदाल अग्नीतांडव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिंदालमध्ये भेट : पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारीही दाखल ; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1 – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीतील एका प्लँटमधे बॉयलरच्या स्फोटाने भयंकर आग लागली. दिवसभरात 19 स्फोट झाल्याचे समजते. या आगीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असुन ते घटनास्थळी भेट दिली आहे. या दरम्यान पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, प्रांत तेजस चव्हाण, पोलीस महानिरीक्षक, बी. जी. शेखर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, सहायक दिलीप खेडकर, पवार आदीनी घटनास्थळी भेट दिली असुन सर्वजण बचाव कार्य करून आग कशी आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न करीत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर मयत व जखमी कामगारांना काय मदत करतील याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. त्याच प्रमाणे सदर ठिकाणी मुंबई आग्रा महामार्ग असल्याने आणि कंपनीला आग लागल्याने मुंबईहुन दिल्लीकडे जाणारे विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या आगीची माहिती घेण्यासाठी मिलीट्रीला पाचारण करण्यात आले असुन हेलीकाप्टरच्या माध्यमातुन रेकी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १९ जखमी कामगारांना नाशिक येथील सुयश हॉस्पीटलमध्ये दाखल केले असुन एक महिला कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे समजते. कंपनी व्यवस्थापक एन. एच. मधुबोल यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना आगीबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची रुग्णालयात भेट घेतली. मृत व्यक्तींच्या नातेवाईक यांना 5 लाखाची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!