घोटी येथे कर्णदोष विद्यार्थी तपासणी आणि श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – स्वदेस फाऊंडेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान,  समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण इगतपुरी यांच्या सहकार्याने इगतपुरी तालुक्यातील कर्णदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर संपन्न झाले. घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणधिकारी निलेश पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, डॉ. अविनाश गोरे आदींच्या मार्गदर्शनाने हे शिबिर पार पडले. १६० विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी ७८ विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप केले. उर्वरीत विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया व मेडिसिनसाठी संदर्भित करण्यात आले.

डॉ. गिता कदम, डॉ. अमृता यांनी विद्यार्थ्यांची तपासणी व श्रवणयंत्र वाटप केले. स्वदेस फाऊंडेशन नाशिकचे महाव्यवस्थापक सुरेंद्र यादव, वरीष्ठ व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, नयन धाडवे, योगेश तोतरे, राहुल टेभे यांच्या सहकार्याने उपस्थित विद्यार्थ्यांची नियोजनपूर्वक तपासणी झाली. विशेषतज्ञ उत्तम आंधळे, स्मिता खोब्रागडे ,विशेष शिक्षक बाप्पा गतीर, संजय पाटील, संदीप शिरसाठ, योगेश शिंदे, वनिता तपकीरे, निलाक्षी शेलार, निलम पवार, नोडल ऑफिसर डॉ. दत्ता देवकते, डॉ.पियुष वाघेरे, डॉ. मुकेश सोनवणे, डॉ. तेजस निकम, डॉ. सूनयना जावळे, डॉ. शिल्पा थोरात, डॉ. चारुशीला बागुल, डॉ. सुप्रिया बोऱ्हाडे, संदीप ओझरकर, प्रकाश भुसारे, निरंजन नाईक यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.   

Similar Posts

error: Content is protected !!