
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – कुऱ्हेगाव येथे दलित वस्तीमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे, माजी उपसरपंच बाळु धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पवार, जेष्ठ नेते गंगाराम धोंगडे, आरपीआय नेते देवराम पवार, उपसरपंच नामदेव धोंगडे, जेष्ठ नेते तुळशीराम धोंगडे, बाळु पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कुऱ्हेगावातील सर्वांगीण विकास आणि दलित वस्तीचा शाश्वत विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे असे सरपंच भाऊसाहेब धोंगडे यावेळी म्हणाले.
ह्या काँक्रीटीकरण कामासाठीचा निधी नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे देण्यात आला आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी हा निधीतून खर्च केला जातो. कुऱ्हेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांनी विशेष पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुशीला काशीनाथ मेंगाळ यांच्या निधीतुन हे काम मंजूर करून आणले असे जितेंद्र पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य ताराबाई सुकदेव पवार होत्या.