प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथे पाणी पुरवठा योजनेच्या विहीर कामाचे भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुकणे येथे नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर झाली असुन सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव यांच्या अथक पाठपुराव्याने पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. आज या कामाचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव भास्कर खोसकर, बाजार समितीचे माजी संचालक सुनील जाधव, आदिवासी संघटनेचे युवानेते तुकाराम वारघडे आदींसह मान्यवरांच्या हस्ते मुकणे धरणाजवळ नवीन विहिरीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव, निवृत्ती आवारी, व्हॉइस चेअरमन काळु आवारी, सोसायटी संचालक गणेश राव, गजीराम राव, पोपट राव, पोपट वेल्हाळ, स्वराज्य संघटनेचे गोकुळ राव, पोपट राव, मोहन बोराडे, भास्कर आवारी, निवृत्ती राव, ज्ञानेश्वर राव, सचिन बोराडे, किसन बोराडे, सीताराम बोराडे, शांताराम राव, अंकुश राव, सुनिल राव, किरण भवर, ग्रामसेवक खैरनार आदींसह मुकणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.