इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
सलग दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यासाठी आशेचा किरण देणारी बातमी आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 35 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर दुसरीकडे उपचार घेणाऱ्यांपैकी 36 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहे. आता फक्त 285 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इगतपुरी तालुक्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. दिवसभराची संचारबंदी सुरू असून तालुक्यातील मोठ्या गावांत अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या नावाखाली अजूनही लोक गर्दी करीत असल्याचे दिसून आले. गावातील प्रवेशद्वारावर संबंधित ग्रामपंचायतींनी चोख नियोजन केल्यास गर्दीवरील नियंत्रण मिळवता येईल असा सुर व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरण कार्यक्रम सक्षमतेने करीत आहे. असे असतांना बेलगाव कुऱ्हे भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. मधुमेह आणि रक्तदाब वगैरेंबाबत वृद्धांची दमछाक केली जात असून अनेकांना लसीकरण न करता घरी पाठवले जात आहे. ज्यांना लसीकरण देणे आवश्यक आहे त्यांनाच मनमानी करून परत पाठवले जात असल्याने कंटाळून अनेक वृद्धांनी लसीकरण न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सध्याच्या काळात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी देवदूताची भूमिका बजावत असल्याने त्यांच्याबाबत नकारात्मक लिहिण्याची इगतपुरीनामाची भूमिका नाही. तशी परिस्थिती इगतपुरीनामा वर संबंधितांकडून येणार नाही अशी अपेक्षा आहे. इगतपुरी तालुक्यातील आरोग्य सेवेचे काम सर्वोत्तम असून काही मूठभर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ह्याला गालबोट लागू नये अशीच आमची भूमिका राहणार आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे! 7038394724