इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील विजय रामकृष्ण गुंजाळ वय 50 यांनी इगतपुरी जवळच्या एका तळ्याजवळ आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मागील आठवड्यात एका घटनेच्या संदर्भात इगतपुरी पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यापासून ते बेपत्ता झाले होते. आज त्यांनी आत्महत्या केल्याबाबत निष्पन्न झाले आहे. घोटी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून ते काम पाहत होते. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान अनमोल असणारे जीवन संपवण्याच्या घटना वाढत असून टोकाचे निर्णय घेऊ नये अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.