इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
नवनवीन खेळ, आगळावेगळा खाऊ, मस्ती, गाणी आणि गप्पा यांची येथेच्छ मेजवानी इगतपुरी तालुक्यातल्या धामडकीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली. “तारे जमीन पर” ह्या लोकप्रिय चित्रपटाचे चित्रीकरण न्यू इरा हायस्कुल पाचगणी येथे झालेले आहे. ह्या शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी धामडकीवाडीच्या विद्यार्थ्यांना विविधांगी आनंद दिला. यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी वाडीतील प्रत्येक कुटुंबात जाऊन सूक्ष्मपणे लोकजीवन अभ्यासले. आदिवासी कुटुंबांनी सर्वांचे स्वागत करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी केले. पाचगणी शाळेचे शिक्षक श्री. हसता आणि ॲडव्हेन्चर एज्युकेशन टूर मुंबई यांच्या सहकार्याने धामडकीवाडीत मुलांसाठी तारे जमीन पर हा उपक्रम पार पडला.