इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघ्याचीवाडी शाळेला इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे सदस्य डॉ. इस्मत गबुला यांच्या हस्ते वाचनालयासाठी कपाट व पुस्तके भेट देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थकडून वाघ्याचीवाडी शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकासासाठी दरवर्षी मोठा समाज सहभाग दिला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी ह्या हेतुने अनोखा उपक्रमाची सुरवात करण्यात आली. ह्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ठाकरे, सविता दातीर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
वाघ्याचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ठाकरे ह्यांनी शाळेतील परसबागेतून ह्या वर्षी 1 क्विंटल कांदे पिक घेतले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात परसबागेतून भाजीपाला सुद्धा मोठया प्रमाणात तयार करून तालुक्यातील पाहिली शाळा बहुमान मिळवला आहे. याबद्धल इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थकडून श्री. ठाकरे यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून गबुला फाऊंडेशनचे संस्थापक अब्बासली गबुला, डॉ. इस्मत गबुला, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ डिस्ट्रिक्ट 314 चे अध्यक्ष संजूकता बरीक, सचिव शिल्पा भारतीय यांच्याकडून वाचनालय साहित्य भेट देण्यात आले.