निनावी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात : सही पोषण देश रोशन उपक्रमातून रानभाज्या महोत्सव

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 24

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या दृष्टिकोनातून बाहेरील जगाचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होऊन मुलांनी आत्मसात करावे यासाठी येथील शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती उपाध्यक्षा शैला भगत  यांनी केले. यावेळी सरपंच गणेश टोचे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळावा यशस्वी झाला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शेतातील ताजा भाजीपाला,  सही पोषण देश रोशन या उपक्रमातून रानभाज्या, वेगवेगळे पदार्थ, कटलरीच्या वस्तू, विविध प्रकारची फळे, चिप्स, खेळणी, चहा, वडापाव, पाववडा, गुलाबजाम, पाणीपुरी, भजी पाव,  पोहे, चॉकलेट, गुलाबजाम, पेरू, बोरे, चिंच, ऊस,  केळी,  टोमॅटो, चहा अशा विविध प्रकाराच्या वस्तूंचे  स्टॉल मांडले होते.

बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना उद्योजक होण्याची प्रेरणा मिळते. समाजात वावरण्याची जाणीव निर्माण होते. मालाची खरेदी विक्री केल्याने गणितीय व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होते. यातून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन शाळेविषयी गोडी निर्माण होत असल्याने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
- किरणबाई बाविस्कर, मुख्याध्यापिका निनावी

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शंकर खैरनार यांनी तर दत्तात्रय बोरसे यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका किरणबाई बाविस्कर, जेष्ठ शिक्षक दत्तात्रय बोरसे, विक्रम गोवर्धने, श्रीराम सूर्यवंशी, उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे, शंकर खैरनार, शारदादेवी सोनवणे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शिवाजी भोर, रामनाथ टोचे, नाना टोचे, दशरथ गायकवाड, काळू गारे, मधुकर पारधी, गुलाब टोचे, संजय पारधी, अशोक भोर, अमृता कुंदे, सविता कुंदे, शालू गोवर्धने, भीमा गायकवाड, बबन जाधव, सागर गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, समाधान सोनवणे, चिंतामण भगत, रत्ना आवाली आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!