इगतपुरी पंचायत समितीसाठी गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी लॅपटॉप आणि प्रिंटरचे लोकार्पण : जनतेच्या सेवेसाठी गतिमान कारभारासाठी होणार फायदा – गोरख बोडके

इगतपुरीनामा न्यूज, दि.  २९

इगतपुरी पंचायत समितीच्या गतिमान कामकाजाला लॅपटॉप आणि प्रिंटर नसल्यामुळे अडथळा निर्माण होत होता. परिणामी याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत होता. म्हणून इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्याकडे याबाबत आपले बहुमोल सहकार्य करण्याची विनंती केली. गोरख बोडके यांनी तातडीने दखल घेऊन लायन्स क्लब ऑफ नाशिक मेट्रो यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला. आज पंचायत समिती कार्यालयात लॅपटॉप आणि प्रिंटरचे लोकार्पण करण्यात आले.

लोकप्रतिनिधी ह्या नात्याने लोकांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मी अखंडपणे कार्यरत आहे. विकासाच्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जातात. ह्या कार्यालयात काही अडचण उद्भवली तर त्याचा मोठा फटका नागरिकांना बसल्याशिवाय राहत नाही. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कार्यालयासाठी लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून दिले आहेत असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके म्हणाले. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी गोरख बोडके यांच्या कामाचे कौतुक करून सामाजिक सहकार्य केल्याबद्धल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी पीके ग्रुपचे प्रशांत कडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश चव्हाण, इगतपुरी शराध्यक्ष वसीम सय्यद, शरद हांडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!