![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2022/08/wp-1660976538791.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, नाशिक या अग्रगण्य संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या रविवार दि. २१ ला होणार आहे. ही सभा सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ह्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव संदीप दराडे, व्हॉइस चेअरमन पांडुरंग वाजे, संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, पंडितराव कटारे, गोटीराम खैरनार, मधुकर आढाव, विक्रम पिंगळे, नितीन भडकवाडे, भाऊसाहेब पवारं, अमित आडके, किशोर वारे, विमल घोडके, मंगला बोरसे यांनी केले आहे.
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2022/08/wp-1660976526984.jpg)