इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
गोंदे दुमाला येथील महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ, नाशिक संचलित श्री सिद्धीविनायक माध्यमिक विद्यालयात इगतपुरीच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल हिरालाल चौधरी, वनपाल आर. के. अहिरे, एस. टी. माटेकरी, एन. आर सरोदे, वनरक्षक व्ही. बी. पासलकर,मुख्याध्यापक एस. बी. थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी विविध पर्यावरण विषयक घोषणा देण्यात आल्या. वृक्ष लागवड व वृक्षसंगोपन संगोपन विषयी गावात वृक्षदिंडीद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक वनीकरण विभाग वनपरीक्षेत्र इगतपुरी यांच्यावतीने ५० उपयुक्त रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले
सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकाऱ्यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागामार्फत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्राथमिक गट ५ वी ते ७ वी मध्ये प्रथम गायत्री हिरामण आहेर, द्वितीय ऋषभ नारायण ठाणगे, तृतीय ओम गणपत खांडबहाले, 8 वी ते 10 वी गटात प्रथम श्वेता विष्णू नाठे, द्वितीय ज्योती भास्कर सोनवणे, तृतीय आदित्य प्रकाश खांडबहाले, 11 वी ते 12 वी गटात प्रथम प्रसाद लक्ष्मण भवारी, द्वितीय गायत्री वसंत पवार, तृतीय अजय आबा जाधव, उत्तेजनार्थ पायल संजय महाले यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हिरालाल चौधरी, मुख्याध्यापक एस. बी. थोरात यांनी यांनी पर्यावरण विषयक मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस. जे. धातडक यांनी केले. श्री. जरोठे सर, श्री. गायकर सर, प्रा. भोर सर, श्रीम. पाटील, डी. बी. पाटील, एस. के. ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले.