शेतकऱ्यांच्या रस्त्यांचे प्रश्न कधी सुटणार आहेत ? रस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नामुळे शेतकरी आले मेटाकुटीला

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक खडकाळ आणि डोंगराळ जमिनींना सुद्धा सोन्यापेक्षा जास्त भाव येऊ लागला आहे. सिंचनाच्या सोयी झाल्यामुळे शेतीच्या उपयोगी नसलेल्या जमिनी सुद्धा वापरात यायला सुरुवात झालेली आहे. पूर्वीच्या काळाप्रमाणे असलेल्या रस्त्यांतून बैलगाड्या जातील एवढा सुद्धा अनेक ठिकाणी रस्ता राहिलेला नाही. रस्त्यांवर बेमालूमपणे अतिक्रमणे झाली आहेत. यासह जमिनीचे विभाजन अनेकांमध्ये झालेले असल्याने जमिनीत जाण्याचे […]

दशकापासून बंद असणारा नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत

नाशिक सहकारी साखर कारखाना एका दशकापासून बंद आहे. त्यामुळे ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर ह्या चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. ह्या चार तालुक्यात लाखो टन उसाचे उत्पादन आजही घेतले जाते. मात्र ह्या चारही तालुक्यांना साखर कारखान्याचा पर्याय आजमितीला उपलब्ध नाही. यासह नाशिक सहकारी साखर कारखाना चालू होईल की नाही […]

error: Content is protected !!