इगतपुरीनामा न्यूज, दि. १ गोंदेदुमाला । पुढारी प्रतिनिधीस्वतःच्या सोमवारी 3 मे ला होणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायला गेलेल्या 28 वर्षीय युवकाचा शेणवड बुद्रुक पाटीलवाडी पाझर तलाव भागात मृतदेह आढळून आला. आज सकाळी उघडकीस आलेल्या ह्या घटनेमुळे माणिकखांब भागात दुःखाचे सावट पसरले आहे. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने ह्या युवकाचा अज्ञात कारणावरून हा निर्घृण खून झाला. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 23इगतपुरी शहरातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांना मातृशोक झाल्याने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजेंद्र गुप्ता यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट दिली. रामदास आठवले यांचे राजेंद्र गुप्ता यांच्या घरी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांनी घरी जाऊन त्यांचे सात्वंन केले. या प्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उप […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 8इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक पी. एस. फुलारे यांचे अपघाती निधन झाले.अतिशय गरीब व सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीला प्रारंभ केला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर फार मोठे दुःख निर्माण झाले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 8इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती रामदास विठ्ठलराव घारे यांचे दि. 7 एप्रिलला अल्पशा आजाराने निधन झाले. शांत संयमी, अभ्यासू, विचारवंत आणि सुसंस्कारित विचारांचे रामदास घारे ओळखले जात. त्यांचे निधन झाल्याचे समजताच इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. इगतपुरीचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव घारे यांचे ते सुपुत्र होत.इगतपुरीसह संपूर्ण जिल्हाभरात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि […]