काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांना भारत आदिवासी पक्षाचे उमेदवार कांतीलाल जाधव यांचा बिनशर्त पाठिंबा घोषित : इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघासाठी एकमेव पर्याय काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव – कांतीलाल जाधव

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील भारत आदिवासी पक्षाचे अधिकृत उमेदवार कांतीलाल जाधव यांनी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना त्यांच्या समर्थकांसह बिनशर्त पाठिंबा घोषित केला आहे. आज कावनई येथे झालेल्या प्रचार सोहळ्यावेळी कांतीलाल जाधव यांनी स्वतः आपली भूमिका घोषित केली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाला ठेकेदार आणि भांडवलदार प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी एकमेव पर्याय फक्त […]

३ हजार ३०० कोटी रुपयांची शाश्वत विकासकामे करणारे प्रामाणिक उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवा – उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार : आगामी काळातही कोट्यवधी रुपयांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – हिरामण खोसकर

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – हिरामण खोसकर हे आदिवासी समाजातील अत्यंत मेहनती आणि प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकासासाठी ३ हजार ३०० कोटी रुपयांची विकासकामे त्यांनी आणली. आगामी काळात ह्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबककरांनी घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबून हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवावे. घोटी, हरसूल येथे आधुनिक […]

“ओल्या सुक्या”साठी कार्यकर्त्यांची वारी.. जाते सर्व पक्षांच्या सभेच्या द्वारी : गाडीभाडे, खाणे पिणे अन मजुरीचा खर्च काढण्यासाठी सर्वांचा आटापिटा

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज : विधानसभा निवडणुकीसाठी गावागावात प्रचाराचे रणशिंग चांगलेच जोरात वाजत आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची प्रचारफेऱ्या आणि लोकांच्या भेटीने दमछाक झाली आहे. मतदानाचा दिवस अगदी जवळ आल्याने प्रचारसभांचा मौसम आहे. सभेसाठी येणारे कार्यकर्ते, महिला, युवक यांची लक्षणीय संख्या सामान्य माणसांना आकर्षण वाटत असतात. यावरून कोण उमेदवार निवडून येईल याचा कल मांडला जातो. […]

महिंद्रा ते बोरटेंभे आणि सिन्नरफाटा ते सभास्थानापर्यंत महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांची आज पायी महारॅली : दुपारी घोटीत होणार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सभा

इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांचा झंझावात सुरु आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज दुपारी घोटीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सभा होणार आहे. ह्या सभेला मोठी गर्दी होणार असून शक्तीप्रदर्शन केले जाण्याचा अंदाज आहे. शक्तीप्रदर्शनाच्या अनुषंगाने आज सकाळी ११ वाजता […]

वाडीवऱ्हे पोलिसांकडून अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात धडक कारवाई : दोन तलवारी व एक गावठी कट्टा हस्तगत

इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस सक्रिय आहेत. यानुसार इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनने आचारसंहिता काळात मोठी कारवाई केल्याने वाडीवऱ्हे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी केलेल्या […]

उद्या इगतपुरी आणि घोटीत आमदार हिरामण खोसकर यांची महारॅली : दुपारी घोटीत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची निर्णायक प्रचारसभा : महायुतीचे पदाधिकारी झपाटून लागले कामाला

इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते यांच्या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सभेपूर्वी इगतपुरीतुन महारॅली काढण्यात येणार असून घोटी शहराही महारॅली होणार आहे. इगतपुरी आणि घोटी शहरातील रॅलीत […]

जनसंवादी पार्टीचे उमेदवार अनिल गभाले यांच्या प्रचारार्थ घाटनदेवी मंदिरापासून रॅली व खंबाळे येथे होणार प्रचारसभा

इगतपुरीनामा न्यूज -इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकास गेल्या १५ वर्षापासुन रखडला असुन शेतीमाल आणि पिकाला योग्य भाव नाही. बेरोजगारी, पिण्याचा पाणी प्रश्न, आरोग्य, पर्यटनाचा विकास, जनतेचे मुलभुत हक्क व विकासाचा मुद्धा सोडवला गेला नाही. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी अनिल गभाले जनसंवादी पक्षाकडून उमेदवारी करतोय. मतदारसंघात मी विकासगंगा आणायला कायम वचनबद्ध राहणार […]

पुन्हा रेकॉर्डब्रेक गर्दीचा उच्चांक – मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल ; खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला खाली खेचा : लोकशाही आणि संविधान वाचले तरच आपलं अस्तित्व : येऊद्या हजारो वादळे पण हा लकीभाऊ जाधव डगमगणार नाही…! ; मायबापांच्या आशीर्वादाने लकीभाऊ जाधव आमदार होणारच..! : काँग्रेसच्या उपकारावर गद्धारी करून मते मागणाऱ्यांना मते देऊ नका

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लकीभाऊ जाधव यांना हरवण्यासाठी त्र्यंबकमध्ये होतो तसा कुंभमेळा करण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या उपकारावर गद्धारी करून मते मागणाऱ्यांना मते देऊ नका. या निवडणुकीत ज्यांनी ५० खोके घेतले त्यांना आता घरी बसवा. या लोकांनी चोरी करून सरकार स्थापन […]

“पंजा”च येतोय – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या त्र्यंबकला जाहीर सभा : गरिबांचा उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रीय अध्यक्षांचे विशेष लक्ष

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे उमेदवार युवा योद्धा लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या गुरुवारी प्रचारसभा होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे सकाळी ११ वाजता ही विराट प्रचार सभा होत असून ह्या प्रचारसभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. ह्या सभेद्वारे लकीभाऊ […]

शुक्रवारी घोटीत होणार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची निर्णायक प्रचारसभा : महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे पदाधिकारी उतरले मैदानात

इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते यांची सभा होणार आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता घोटी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात समर्थकांच्या मोठ्या गर्दीत ही प्रचार सभा होणार आहे. […]

error: Content is protected !!