इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यात आज ३६ कोरोना बाधित रुग्ण कोरोना आजारापासून बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळ ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ३५ व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर पर्यंत १८४ कोरोना बाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे रुग्णसंख्येत घट होत आहे. बाधित आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या समान पातळीवर येत असल्याने इगतपुरी तालुक्याला बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे.
गोरख बोडकेंच्या माध्यमातून तैनवाला फाउंडेशनकडून ४ ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर
आज माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या माध्यमातून तैनवाला फाऊंडेशनने ४ ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन दिले आहेत. एकलव्य कोविड सेंटर आणि इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येकी २ ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीनचे वितरण आज झाले. इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते मशीन लोकार्पण करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य गोरख बोडके, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, उपसरपंच अनिल भोपे, रामदास गव्हाणे, समाधान जाधव, अरूण भागडे, निलेश काळे, विक्रम मुनोत, चंद्रकांत आडोळे, सिद्धेश्वर आडोळे, योगेश आडोळे, आदिनाथ आतकरी, विस्ताराधिकारी एस. बी. शेळके, डॉ. अक्षय माघाडे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008