इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण लोकजीवन गोंधळात सापडलेले आहे. आर्थिक उत्पन्नाचा सुद्धा वेग मंदावल्याने वेगवेगळ्या घटकांच्या व्यथा वाढल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, लहांगेवाडी, माळेकरवाडी व गणेशवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ह्या गावांत वास्तव्याला असणाऱ्या 250 आदिवासी गरजु कुटुबांना पुणे येथील रंभा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन व्यवस्थापक रणजीत पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत किराणा वाटप करण्यात आले.
वाटप केलेल्या किटमध्ये एकुण 25 किलो किटमध्ये धान्य, खाद्यतेल तसेच गृहोपयोगी वस्तु देण्यात आल्या आहेत. मोफत धान्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक पंडित कातोरे, रामभाऊ वारुंगसे, शंकर वारुंगसे, वाडीवऱ्हे ग्रामपंचायत सदस्य गोविद डगळे, शासकीय ठेकेदार सुरज कातोरे यांच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाम अंडे, भिमा जाधव, दिनकर डगळे, रामदास चारोस्कर, गोकुळ बांबले, एकनाथ लहांगे आदींसह लाभार्थी कुटुंबप्रमुख व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.