जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी शाहीर उत्तम गायकर

त्र्यंबक जाधव, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

मराठा सेवा संघ प्रणीत जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील नामवंत शाहीर उत्तम गायकर यांची नियुक्ती झाली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा निर्मला पाटील यांनी श्री. गायकर यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले. विविध कलागुण असणारे शाहीर उत्तम गायकर हे महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व असून त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

नियुक्तीपत्र देतेप्रसंगी महासचिव बालाजी जाधव, प्रदेश उपाध्यक्षा सुनंदा जरांडे, छाया पाटील उपस्थित होते. विभागीय अध्यक्षपदाच्या माध्यमातून सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यात येईल. यानिमित्ताने संत साहित्यासह इतर साहित्य प्रकार जनमानसात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जीवाचे रान करील असा शब्द उत्तम गायकर यांनी दिला.

जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी शाहीर उत्तम गायकर यांना शुभसंदेश पाठवून अभिनंदन केले. पदाच्या माध्यमातून आपण कार्य करून मिळालेल्या पदाचा सन्मान वाढवाल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.