

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाब्याचे संचालक विलास भाऊ चाटे यांना नाशिक की पेहेचानमार्फत दिला जाणारा यावर्षीचा बेस्ट रेस्टॉरंट इन नाशिक हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या आमदार सीमा हिरे, आयोजक रसिका गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे. अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद देण्यासाठी हॉटेलचे जेष्ठ संचालक बंडूशेठ चाटे, अविनाश भाऊ चाटे हे नेहमीच कसोशीने प्रयत्न करीत असतात. अनेकजण या ढाब्याचे नेहमीच कौतुक करतात. ग्राहकांच्या मनामनात अबाधित स्थान निर्माण करणाऱ्या १९७० ओल्ड प्रभू ढाब्याला उत्कृष्ट हॉटेल पुरस्कार मिळाल्याबद्दल हिरामण नाठे, राजू जाधव, वसंतराव धोंगडे, विजय नाठे, किसन नाठे, ज्ञानेश्वर मालुंजकर, रामा नाठे, पत्रकार विकास शेंडगे, लक्ष्मण सोनवणे आदींनी शुभेच्छा दिल्या. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हा बहुमोल पुरस्कार आम्हाला मिळाला. आमच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असणार असल्याचे ओल्ड प्रभू ढाब्याचे संचालक विलास भाऊ चाटे यांनी सांगितले
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps