प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
मुकणे येथील सोन्याबाई नामदेव आवारी ( वय ९५ ) यांचे रविवारी आषाढी एकादशीला निधन झाले. घोटी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी सुभाष भिमा आवारी, मुकणे ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पंढरी आवारी व मुंबई राखीव पोलीस दलातील संदीप भास्कर आवारी यांच्या त्या आजी होत.
मुकणे गावासह पंचक्रोशीत सुपरिचित असलेल्या शेतकरी कुटुंबातील भिमा नामदेव आवारी, पंढरी नामदेव आवारी व भास्कर नामदेव आवारी यांच्या त्या मातोश्री होत. उद्या मंगळवार दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता मुकणे येथे त्यांचा दशक्रिया विधी होणार असुन हभप प्रा. मनोहर महाराज घोडे यांचे यावेळी प्रवचन होणार आहे.