इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
नाशिक मुंबई लेनवर नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या वळणावर पहाटेच्या सुमारास क्रुझरचा अपघात झाला. MH 22 U 2801 ह्या क्रमांकाचे हे वाहन भरधाव वेगात जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन पलटी होऊन रोडच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला आदळुन अपघात झाला. या अपघातात दर्शना विजय कांबळे वय 11 वर्ष रा. मंठा जि. जालना ही बालिका ठार झाली आहे. तर 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ह्या अपघातात लिहीलाबाई लिंबाजी राठोड वय ३०, लिंबाजी राठोड वय ४० दोघे रा. मालेगाव, विठ्ठल चव्हाण वय ४५, जयश्री गजानन पवार वय ३४, अन्वी गजानन पवार वय ०१, कल्पना राजेश जाधव वय ३०, शामराव चव्हाण वय ६० सर्व रा. वसई हे जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीमने मयत व जखमींना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहन बाजूला करून दोन्हीकडची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.