
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
जाँईड इंडिया, शिवशक्ती सायकल, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे जानेवारी ते एप्रिलमध्ये 50 किमीच्या सहा राईडचे नासिकच्या निसर्गरम्य वेगवेगळ्या मार्गावर आयोजन करण्यात आले. त्र्यंबकेश्वर, द्राक्ष नगरी दिंडोरी, रामशेज मार्ग उमराळे, वाडीवऱ्हे, ओझर व शेवटला कश्यपी डॅम या मार्गावर राईड झाल्या. प्रत्येक राईडसाठी 100 पेक्षा जास्त सायकलिस्ट यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक राईडला शिवशक्ती सायकल यांच्याकडून बॅकअप वाहन, टेक्निकल टिम सोबत होती. रायडर्ससाठी केळी, चिक्की, बिस्कीट, चॉकलेट, लाडू,संत्री व फिनीश पॉईडवर सर्व रायडर्स यांना चहा नाश्त्याची सोय करण्यात आली. या राईडमध्ये नव्यानेच सायकलिंग सुरू केले त्यांना त्याचा खूप फायदा झाला. कारण 100 पेक्षा जास्त सायकलिस्ट यांच्यासोबत नव्या जुन्यांचा संगम, वेळेचे बंधन नाही. सोबत बॅकअप वाहन टेक्निकल टिम आणि फक्त 50 किमी सायकलिंग त्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला.

जीआरसी राईडसाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक राईडला शिवशक्तीच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. सर्व 6 राईडच्या दरम्यान सायकलिंग क्षेत्रात ज्यांनी उत्तुंग कार्य केले त्या मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला. GRC च्या राईड संपूर्ण भारतभर असल्या तरी सर्वाधिक सर्वाधिक संख्या नासिक सायकलिस्ट यांची होती.शेवटच्या राईडच्या दिवशी GRC, शिवशक्ती सायकल, नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, किशोर माने, डॉ. मनीषा रौंदळ, दिलीप गीते, नारायण वाघ, देवळा सायकलिस्टअध्यक्ष अरुण पवार, शिवशक्तीचे संचालक भाऊसाहेब काळे, किशोर काळे यांच्या हस्ते सर्व 160 सायकलिस्ट यांचा मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहा राईड यशस्वी पूर्ण करण्यासाठी टीम लीडर संजय पवार यांनी मेहनत घेतली.
GRC चे सर्व स्तरातून कौतुक होत असून सायकलिस्ट यांनी पुन्हा अशा राईड सुरु रहाव्यात अशी भावना अध्यक्ष राजेंद्र वानखडे, किशोर काळे यांच्याकडे व्यक्त केल्या.