इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत टिटोली यांनी गावात विविध सेवा देणाऱ्या प्रशासनात कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. गावातील सर्व महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात महिलांच्या विविध आरोग्यविषयीच्या तपासण्या करून निदान करण्यात आले. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा टिटोलीच्या मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांच्याकडून केक कापुन महिलादिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन इगतपुरी ग्रामीण रुग्णलयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरुपा देवरे उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी आरोग्य हीच धनसंपदा असल्याचे सांगत याविषयीची सविस्तर माहिती दिली. यासह महिलांनी आपले आरोग्य जपावे असा संदेश दिला.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पुजा पगारे यांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला. टिटोलीच्या सरपंच काजल गभाले, ग्रामपंचायत सदस्या माया भडांगे, ज्योती बोंडे, लक्ष्मी गभाले, कोमल हाडप, अंगणवाडी कार्यकर्त्या रंजना भडांगे, रेखा भटाटे, आशा कार्यकर्ती रूख्मिणी भटाटे, गजराबाई बोंडे, अरूणा भटाटे, विजया माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपसरपंच अनिल भोपे, सदस्या मोनाली राऊत, ग्रामसेविका स्वाती गोसावी, शिक्षिका प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, योगिता पवार, ज्येष्ठ शिक्षक राजकुमार गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश बोंडे, प्रविण भटाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांनी केले.