इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
असंघटित आणि असुरक्षित असणाऱ्या बांधकाम कामगारांना आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जावे लागते. बांधकामाचे काम करीत असतांना अनेक छोटे मोठे अपघात होतात. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतांना असे प्रसंग संपूर्ण कुटुंबावर आघात करतात. इगतपुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना आपत्कालीन प्रसंगात पाठीशी उभे राहून सर्व प्रकारचे साहाय्य करण्यासाठी इगतपुरी तालुका बांधकाम कामगार संघटना नेहमीच अग्रेसर असते. जिजाऊ नगर काळूस्ते रोड येथे काम करणारे राजु म्हसणे यांना कामावेळी विजेचा झटका लागला. त्यामुळे त्यांना अपघात सोसावा लागला. यामुळे इगतपुरी तालुका बांधकाम कामगार संघटनेने अपघातग्रस्त राजू म्हसणे यांना आज भरीव आर्थिक सहाय्य देऊन मदतीचा हात दिला. म्हसणे परिवाराला दिलासा देऊन पाठीशी असल्याचा शब्द उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यामुळे म्हसणे परिवाराने सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक जनार्दन ( जनक ) लंगडे, उपाध्यक्ष मदन भगत, खजिनदार सुरेश दुभाषे, उपखजिनदार विष्णू वाघचौरे, राजु लंगडे, विनायक कडू, सुनील बोंडे, मनोज आडोळे, गणेश गवळी, गोरख भागडे, तळोघचे उपसरपंच भगीरथ कडू उपस्थित होते. सखाराम लंगडे, अनिल लंगडे, तानाजी लंगडे, वासुदेव लंगडे, निवृत्ती भटाटे, जालिंदर कडू, लखन राऊत, संतोष बोंडे, एकनाथ आंबेकर आदींनीही आर्थिक मदत आणि साहाय्य कार्यक्रमाच्या प्रसंगी हजेरी लावली. इगतपुरी तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून सर्व सभासद आणि ठेकेदार यांच्याकडून आपत्कालीन कामासाठी आर्थिक निधी संकलन सुरू असते. त्यानुसार हा निधी कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. असुरक्षित असणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाला यामुळे खूप मोठा आधार मिळत असतो. याधीही इगतपुरी तालुक्यात अनेक आपत्तीग्रस्त कामगारांना संघटनेने भरीव आर्थिक सहाय्य दिलेले आहे. त्यामुळे कामगारवर्गात संघटनेचे आभार मानण्यात येत आहे.