त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवरायांची जीवनमूल्य या विषयावर व्याख्यान संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवरायांची जीवन मूल्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. पंकजकुमार गांगुर्डे, प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, अंतर्गत गुणवत्ता समन्वयक प्रा. शरद कांबळे, समन्वयक  प्रा. डॉ. संदीप माळी, डॉ. अशोक भवर, प्रा. ललिता सोनवणे आदी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. पंकज गांगुर्डे आपल्या भाषणात  म्हणाले की, अठरा पगड जातीची माणसांना  महाराजांनी  सोबत घेत कोणावरही अन्याय न करता समानतेच्या मूल्यावर हिंदवी स्वराज निर्माण केले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वाप्रमाणे रयतेची सेवा करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवन मूल्य आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आदर्शवत ठरतात. विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर दूरदृष्टीकोन, समाजहित, आई-वडिलांची सेवा, आदर ही मूल्ये विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे असेही ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती आहे. शेती जपून शेतकरी जगवले जगवले पाहिजे  हे मूल्य छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये रुजविले म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्यांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे. प्रास्ताविक समनवयक प्रमुख व मूल्य आणि जीवन शिक्षण विभागप्रमुख डॉ. संदीप माळी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय डॉ. अशोक भवर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ललिता सोनवणे यांनी, आभार डॉ. शरद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!