स्वच्छतेसाठी महिंद्रा कंपनीचे एक पाऊल पुढे : कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती व मोबाईल व्हॅनच्या आदर्शवत उपक्रमाचा आरंभ

विजय पगारे : इगतपुरीनामा न्युज, दि. 13

घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरूपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही जगासमोर एक मोठी समस्या आहे. याच पार्श्वभूमीवर या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, फिनिश सोसायटी सरसावली आहे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक जयंत इंगळे यांच्या हस्ते महिंद्रा कंपनीचे अधिकारी कैलास ढोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करत एक आदर्शवत उपक्रम राबवत जनजागृती करण्यात आली.

इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक जयंत इंगळे यांच्या संकल्पनेतून कचरा व्यवस्थापनाबाबत एक आदर्शवत उपक्रम राबवत मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर श्री. इंगळे यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, सर्वप्रथम व्यक्तीगत आणि कौटुंबिक पातळीवर याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे. कारण तिथुनच व्यवस्थापनाला सुरूवात होते. हे झाले नाही तर सार्वजनिक यंत्रणा काहीच करूच शकत नाही. अनेक ठिकाणी घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने,आठवडे बाजार, शाळा, मंदिरे, यात्रा, लग्नसमारंभ इत्यादी ठिकाणी पण पुष्कळ प्रमाणात कचरा जमा होतो. न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणतः जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तसेच कुजणाऱ्या कचऱ्याचा उपयोग करून त्यापासून गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करता येत असल्याचे यावेळी व्यवस्थापक जयंत इंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी सुरक्षारक्षक विभागाचे अधिकारी हरिष चौबे, व्यवस्थापक जयंत इंगळे, व्यवस्थापक कैलास ढोकणे, इगतपुरी नगरपरिषदेचे मोहन पवार, फिनिश सोसायटीचे पदाधिकारी मनिष हरले, सुशिल झाडोदे, कमलेश सोनटक्के, मयुर भारूळे, गौरी चंद्रमोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!