इगतपुरीनामा न्यूज, दि. १
लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक शब्दाला प्रतिष्ठा मिळवून देणारे नाव म्हणजे गोरख बोडके हे व्यक्तिमत्व आहे. पायाला भिंगरी लावून २४ तास जनसेवेसाठी फिरणाऱ्या ह्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे गौरवोद्गार भारतीय राजपुत आयएफएस अंकिता वाकेकर यांनी काढले. लोकांच्या कल्याणासाठी अविरत घोडदौड करायला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गोरख बोडके यांनी XUV 700 ही नवीन गाडी खरेदी केली. यावेळी नव्या गाडीची चावी सुपूर्द करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, निमा व आयमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सॅमसोनाईट कंपनीचे उपाध्यक्ष शोरूम मालक जितू भाई आणि गोरख बोडके यांचा मित्र परिवार उपस्थित होता.