सद्गूरू धाम आश्रमात आजपासुन 8 डिसेंबर पर्यंत सद्गुरू कृष्णानंद महाराज यांचा 72 वा प्रकटदिन महोत्सव

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

कसारा शिरोळ येथील वर्लीपाडा येथे स्थित असलेल्या
सद्गूरू धाम आश्रमात आजपासुन 8 डिसेंबर पर्यंत सद्गूरू कृष्णानंद महाराज यांचा 72 वा प्रकटदिन महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती सद्वीप्र सेवा समितीचे राष्ट्रीय संघटक सुनिल महाराज, आचार्य जनेश्वर महाराज, साध्वी अंनतेश्वरीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली

देशभरातुन सेवेकरी मोठ्या संख्येने या प्रकटमहोत्सवासाठी येणार असुन शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधना, ध्यान साधना, स्वर साधना , ब्रम्हदिक्षा, कुंडलीनी जागरण व प्रेमसाधना, राष्ट्रीय संमेलन आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे. सद्गूरू कृष्णानंद महाराज यांच्या वाणीतुन प्रवचन होणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सद्विप्र सेवा समिती आणि संत कबीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!