मैत्रेय गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी विशेष लक्ष देण्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

राज्यात मैत्रेय गृप ऑफ कंपनीचे जवळपास साडेतीन कोटींच्या आसपास गुंतवणूकदार असून ऑक्टोबर २०१५ पासून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक येथे कंपनीच्या मालमत्तेचे सर्व कागदपत्र,सर्व्हर आदी जमा आहे. मंत्रालय स्तरावर अनेक बैठका होऊनही आजपावेतो ठोस असा निर्णय झालेला नाही. म्हणून याकामी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांनी निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे. टिळक भवन येथे पटोले यांची भेट घेत निवेदन देऊन राज्यभरातील गोरगरीब जनतेची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक परत मिळवून देण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती गुंजाळ यांनी दिली. लवकर याविषयी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पटोले यांनी दिले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, जेष्ठ नेते निवृत्ती कातोरे उपस्थित होते.

मैत्रेय उपभोक्ता असोसिएशनचे पदाधिकारी व गुंतवणूकदार सहा वर्षांपासून शासनस्तरावर प्रयत्न करत आहे. गृहमंत्री यांच्यासोबत देखील बैठका होऊन अजूनही घोंगडं भिजत आहे. कंपनीची मालमत्ता जास्त असून परतावा त्यामानाने कमी आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले हे निश्चितच तोडगा काढतील अशी आशा वाटते.
- भास्कर गुंजाळ, सचिव, प्रदेश काँग्रेस

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!