प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
मुकणे ता. इगतपुरी येथील नंदु बोराडे यांचे वडील लक्ष्मण तुकाराम बोराडे ( वय ७५ ) यांचे मंगळवारी दि. २ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणुन ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पारले कंपनीचे कामगार चंदु बोराडे तसेच शिवाजी बोराडे यांचे ते वडील तर राजाराम बोराडे यांचे बंधु होत. त्यांचा दशक्रिया विधी आज सकाळी ८:३० वाजता मुकणे येथे होईल. यावेळी ह. भ .प. प्रा. मनोहर महाराज घोडे यांचे प्रवचन होणार आहे.