
इगतपुरीनामा न्यूज दि. १७
बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर सेटी प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामोन्नती अभियान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच घोटी येथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सहा दिवस सुरू असलेल्या या प्रशिक्षणात महिला बचत गटांच्या ३५ महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उद्योग संधींची निवड बाजार व्यवस्थापन बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे इगतपुरी पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक मिलिंद अडसुरे, तालुका व्यवस्थापक दिपाली वाघ, प्रभाग समन्वयक भगवान आवारी, आरसेटीचे संचालक गणेश सरोदे, गौरव गारे, प्रशिक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली विसपुते यांनी केले.