नाशिकची शान : चिन्मय उदगीरकर!

चिन्मय उदगीरकर, अभिनेता

नाशिकमधील आर. व्हाय. के. सायन्स कॉलेजमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण विज्ञान हा माझा पिंड नव्हताच. त्यामुळे बारावीनंतर मी एन. बी. टी. लॉ कॉलेजला प्रवेश केला. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड असल्यामुळे कोणते क्षेत्र निवडल्यावर मी माझी अभिनयाची आवड जपू शकतो, याचा सारासार विचार केला. तेव्हा कळले की लॉ हे एकमेव क्षेत्र आहे जिथे लेक्चरना बसणे अनिवार्य नसते. सुदैवाने माझी आईसुद्धा वकील असल्याने अभिनयात काही झाले नाही तर वकिलीमध्ये मी काही करू शकेन, या विश्वासाने मी लॉसाठी प्रवेश घेतला.

कॉलेज लाइफ कट्टय़ावरच गेले. त्यामुळे कॉलेज जीवनातील जे काही सुखद, दु:खद क्षण अनुभवले ते सगळे कट्टय़ावरच अनुभवले. कॉलेज जीवनात आयुष्याला कलाटणी देणारा एक किस्सा होता तो म्हणजे, कॉलेजच्या कट्टय़ावर थट्टा-मस्करी सुरू असतानाच ‘जिनिअस’ या नाटय़संस्थेबद्दल कळले. कट्टय़ावरून परस्पर संध्याकाळी त्यांनी नाटय़संस्था गाठून, तिथले प्रमुख प्रवीण सर यांना भेटलेआणि या संस्थेत सहभागी झाले. तिथून मग नाटक आणि अभिनयाचा गांभीर्याने विचार करू लागले तेव्हाच त्यांनी अभिनेता होण्याचं निश्चित केलं.

कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कॉमर्स, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट असे अनेक कॉलेज होते. त्यांचे अस्तित्व वर्गाबाहेरच असायचं त्यामुळे ‘लॉ’पेक्षाही अन्य कॉलेजातले मित्र जास्त होते. आमचा १५-२० जणांचा ग्रुप होता. ‘सांस्कृतिक’ चळवळ करून कॉलेज गाजवले होते.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरातील तिन्ही कॅन्टीन मिसळसाठी खूप प्रसिद्ध होते किंबहुना आहेत. नाशिकमधली मुले खास मिसळ खाण्यासाठी आमच्या कॅम्पसमध्ये यायचे. आम्ही त्यावेळी एकच मिसळ घ्यायचो, त्यावर र्ती परत परत मागून घ्यायचो आणि पाव घेऊन त्या एकाच मिसळीवर सर्व जण ताव मारायचो. कॅन्टीनमध्ये उधारी करायचो आणि मग ते फेडण्यासाठी एखाद्याला बकरा बनवायचो. श्रीकृष्णची, मामाजची पाव भाजी, कृष्णाईचा वडापाव किंवा सुला वाईनयार्डस आमच्याकडे प्रसिद्ध होते, अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही खवय्येगिरी केली.

कॉलेजचा पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दिवस मला लख्ख आठवतात. कारण मुळात ज्या हेतूने मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ते म्हणजे नाटक. जे मी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अखंड करत होतो. मजामस्ती करण्याचे, कट्टय़ावर टवाळक्या करण्याचे, अभ्यासात काटेकोर असल्याचे, घरच्यांना दाखवण्याचे नाटक. ‘लॉ’चा पाच वर्षांचा अभ्यास मी कॉलेजच्या सर्व सोयीसुविधांचा, एटीकेटीचा फायदा घेऊन सात वर्षांत पूर्ण केला. एकही दिवस असा गेला नाही, की त्या कुचाळक्या केल्या नाहीत. कॉलेज जीवनात साठवून ठेवलेल्या या आठवणींचा ठेवा मला ‘प्रेमवारी’ चित्रपट करताना नक्कीच उपयोगात आला.

मालिका, स्वप्नांच्या पलीकडले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, नांदा सौख्यभरे’, गुलाबजाम, ‘घाडगे सून, सख्खे शेजारीण, अग बाई सून बाई ,मराठी सिनेमा वाजलाच पाहिजे गेम कि सिनेमा ,
श्याम चे वडील, प्रेमवारी, मेकअप वाजवूया बँड बाजा या मालिकेतील व फिल्म मधील सुप्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांनी आपल्या अंगी असलेल्या अभिनयाच्या जोरावर अगदी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर हि त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, घराघरांमध्ये आनंदी, खेळकर वातावरण निर्माण केले. असे नाशिक जिल्ह्यातील दिलदार व्यक्तीमत्त्व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
शुभेच्छुक : बंटीभाऊ पगारे, चिन्मय दादा फाऊंडेशन अध्यक्ष व सर्व मित्र परिवार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!