इगतपुरी : सर्व्हिस रोडला तलावाचे स्वरूप, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने इगतपुरी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास दोन तास झालेल्या या मुसळधार पावसाने काही काळासाठी जनजीवन विस्कळित झाले होते.

दरम्यान इगतपुरी शहर आणि परिसरात रस्त्यांमधील खड्डे ही नेहमीची डोकेदुखी आहेच, मात्र पावसाळ्यात याची तीव्रता चांगलीच वाढलेली दिसते. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर काही ठिकाणी खोलगट भाग असल्याने पाऊस सुरू होताच पाणी साचत आहे. तळेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंडर पास (बोगदा) जवळ तर ही नेहमीचीच समस्या झाली असून तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणी अगदी बोगद्यातही पाणी साचत असून पायी चालणाऱ्या नागरिकांसोबतच वाहन धारकांनाही यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्याने येणाऱ्या वाहनांना पाण्याखाली असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान तळेगाव परिसरात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने ऐन पावसात तळेगावकरांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!