इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजने अंतर्गत १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, अव्वल कारकून सोनाली मंडलिक, महेश कुलकर्णी, पुरुषोत्तम रोहेरा आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण ३ लाख 20 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. लाभार्थी शेवंताबाई भाऊ फोडसे, सोनीबाई बबन पथवे, संगीता नामदेव चांदोरे, काळुबाई भाऊ हिंदोळे, अलका अशोक घायवट, सीता दशरथ ढवळे, अलका अर्जुन मते, कविता कृष्ण गोरे, छाया नामदेव जाखेरे, यमुनाबाई ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती नवनाथ मेदडे, मंजुळाबाई अंबादास यले, रंजना रोहिदास गायकर, कविता नवनाथ पेढेकर, अलका भागीरथ घारे, वंदना करवंदे यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजने अंतर्गत आज १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार याप्रमणे निधी वाटप करण्यात आला. ह्या योजनेसह इतर योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी संजय गांधी योजना शाखेत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी यावेळी केले.