नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शैक्षणिक संस्थेने ( ? ) चक्क महापुरुषाची नावे वापरत शासनमान्य असल्याचे भासवत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा घाट घातला होता. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य तथा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी जागरूकपणे या भरतीप्रक्रियेची खोलवर जाऊन चौकशी केली. त्यानंतर हा चक्क फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे उघडकीस आणले. त्यांनी तत्परतेने प्रसारमाध्यम आणि सोशल मिडीयावर याबाबतचे संदेश टाकले. या संदेशाची सर्वात आधी दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत इगतपुरीनामा न्यूज पोर्टलने ही बातमी सर्वात आधी प्रसिद्ध केली होती. नवनाथ अर्जुन पा. गायकर या प्रतिनिधींच्या माध्यमातून इगतपुरीनामा पोर्टलवर ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीची दखल सर्वच स्तरात घेण्यात आली. या बातमीच्या आधारे अनेक तरुणांनी तात्काळ भरती प्रक्रियेतंर्गत ठेवण्यात आलेल्या मुलाखतीस जाणे टाळले. इगतपुरीनामा पोर्टलवरील या तत्पर बातमीचे सोशल मिडीयावर प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. गोरख बोडके व इगतपुरीनामाच्या प्रतिनिधीवर या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव झाला आहे. या बातमीची दखल घेत घेऊन गोरख बोडके यांच्याकडून माहितीची दखल घेत तातडीने पोलीस प्रशासनाने दखल घेतली. संबंधित शैक्षणिक संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाखती साठी जायची तयारी करत असतानाच इगतपुरीनामा वेब पोर्टलवरील बातमी वाचली. बातमी विश्वासार्ह असल्याने मुलाखतीस जाणे रद्द केले. आमची संभाव्य फसवणूक गोरख बोडके, इगतपुरीनामा, प्रतिनिधी नवनाथ गायकर यांच्यामुळे टळली. त्यांचे आम्ही आभार मानतो अशी प्रतिक्रिया जीवन पानपाटील ( मुंढेगाव ), दत्ता सोनवणे ( चिंचखेड ), श्रीराम तोकडे ( इगतपुरी ), डॉ. दत्ता सदगीर ( घोटी ) यांनी दिली.