दोन वेगवेगळ्या अपघातात २ युवक जखमी : नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेने वाचवले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

मुंबई आग्रा महामार्ग भागात आज झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा प्राण बचावला.

पहिल्या अपघातात पाडळी देशमुख रेल्वे स्थानकाजवळ साहिल राशिद अली वय 21 रा. उत्तर प्रदेश हा युवक रेल्वे गाडीतून पडलेला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या अपघातात नाशिककडे जाणारी मोटारसायकल MH 15 7556 घसरल्याने अपघात झाला. यामध्ये शुभम विजय नकारे वय 21 रा. कोपरगाव हा जखमी झाला. त्याला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!