अभाम साहित्य परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हातंर्गत नाशिक शहराध्यक्षपदी प्रसिद्ध युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. आनंद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकर यांनी ही नियुक्ती केली आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नाशिक येथे आयोजित बैठकीत भरवीरकर यांना निवडीचे पत्र देविदास खडताळे, प्रा.अहिरे व गायकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रशांत भरवीरकर हे प्रसिद्ध युवा साहित्यिक असुन त्यांचे अनेक विषयांवर सातत्याने लेखन सुरु असते. मराठी भाषिक साहित्य वर्तुळातील आघाडीच्या नामवंत युवा साहित्यिक यांच्या मध्ये भरवीरकर यांचे नाव अग्रणी आहे. या बैठकीस देविदास खडताळे, प्रा.आनंद अहिरे, माणिकराव गोडसे, बाळासाहेब गिरी, भाग्यश्री गुजर, प्रदीप पाटील, रविंद्र पाटील व प्रशांत भरवीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. नियोजित १० व्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. अध्यक्ष स्थानी प्रा. अहिरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देविदास खडताळे व नवनाथ गायकर उपस्थित होते.

आपल्या निवडीबद्दल बोलताना आगामी काळात आपण नाशिक शहराला साहित्यिक चळवळीचे गोकुळ व पंढरी बनवू अशी ग्वाही नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत भरवीरकर यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार व अभिनेते शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. आनंद अहिरे, जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर, उपाध्यक्ष माणिकराव गोडसे पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब गिरी, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील, नाशिक तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, भाग्यश्री गुजर, विद्या पाटील, श्रीराम तोकडे, देवचंद महाले, सावळीराम तिदमे, तुकाराम धांडे, प्रदिप गुजराथी, काशिनाथ गवळी, भरत सानप, राजु लाहिरे, भगवान बागुल, शांताराम वाघ, संजय निकम, किरण मोरे, आबा अहिरे, लता पवार, योगेश जोशी, संजय कान्हव, तुकाराम चौधरी, अंबादास खरोटे आदीसह असंख्य साहित्यिकांनी त्यांचे निवडीचे स्वागत केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!