कवी – जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
अठरा विश्व दुःखात,
पहा जन्मास मी आलो !
दुःख गिळून आनंद,
धुंडाळत मी राहीलो !!
गुलतुराच्या झापात,
मी शिक्षण घेत गेलो !
आई बापाच्या प्रेमात,
लहानचा मोठा झालो !!
ठेच लागता मनाला,
खळग्यात मी पडलो !
खळग्या मुळेचं माझ्या,
जीवनात मी घडलो !!
वाटेत दिसता काटा,
दुर सारत मी गेलो !
कठीण यशो शिखरे,
हिंमतीने मी चढलो !!
भरतीच्या सागरात,
मनसोक्त मी पोहलो !
हात पाय हलवुन,
तरबेज मी जाहलो !!
आयुष्यातील दुःखाला,
हरवण्या मी शिकलो !
लक्ष्य साध्य करण्याशी,
माणसात मी फिरलो !!
दुःख देणाऱ्या माणसा,
नाही कधी मी नडलो !
माफी मागुनी तयाची,
मित्ररुपी मी जोडलो !!
कधी स्वार्थ संपत्तीशी,
माझे म्हणत राहिलो !
बेगडी हव्यासापायी,
सुख कधी मी मुकलो !!
स्व जीवन चिंतनात,
एकटाच मी बसलो !
आई बाप असे थोर,
पुटपुटत मी बोललो !!
आई बापा सय येता,
एकटाच मी रडलो !
आयुष्याच्या शेवटाला,
“आई”शोधत राहीलो !!
( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून संवेदनशील कवी आणि लेखक आहेत. )