उल्हासनगर ते वैष्णोदेवी सायकल प्रवास करणाऱ्यांचा कळसुबाई मंडळाकडून घोटीत सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

उल्हासनगर येथील जय माता दी ग्रुपचे १२ सदस्य उल्हासनगर ते वैष्णोदेवी पर्यंतचा प्रवास सायकलने करतात. त्यांचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेऊन यात्रा पूर्ण करतात. जय माता दी ग्रुपचे सदस्य रोज २०० किलोमीटर अंतर सायकल चालवून आगेकूच करतात. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाने या वैष्णोदेवी मातेच्या भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व सदस्यांचा सन्मान केला.

जय माता दी ग्रुपचे सदस्य लोकेश हटकर, जगदीश वांजरे, करण दळवी, पंकज उज्जनकर, मुकुंदा सोनवणे, मनोर सोनवणे, चेतन सोनवणे, सोनू जगताप, अभिजित कडवे, दीपक हटकर, सुनील उज्जनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांची आजच्या भोजनाची व्यवस्था मंडळाचे सदस्य पुरुषोत्तम भास्कर बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानी करून पुढील वाटचालीसाठी या अनोख्या भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी  कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सचिव बाळासाहेब आरोटे, भास्कर बोऱ्हाडे, पुरुषोत्तम बोऱ्हाडे, अशोक हेमके, ज्ञानेश्वर मांडे, प्रवीण भटाटे, उमेश दिवाकर, निलेश पवार, भगवान तोकडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!