
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या खैरगाव ते शेणवड बुद्रुक ह्या रस्त्यावरील नव्या पुलामुळे दोन्ही बाजूकडील नागरिकांचा पावसाळ्यातील त्रास कायमचा संपला आहे. पूल बांधल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यातील चित्र पाहून आदिवासी नागरिकांनी आत्यंतिक समाधान व्यक्त केले आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपसभापती विठ्ठल लंगडे, उपसरपंच कैलास कडू यांच्या प्रयत्नांनी झालेल्या पुलामुळे दळणवळण सुलभ झाले आहे. यामुळे ह्या भागातील आदिवासी नागरिकांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. इगतपुरीच्या जिल्हा परिषद उपविभागामार्फत झालेल्या चांगल्या कामांचे कौतुक करण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव आणि शेणवड बुद्रुक ह्या भागात अनेक आदिवासी वाडेपाडे आहेत. ह्या भागात पावसाळ्यात पावसामुळे नेहमीच नागरिक समस्यांचा सामना करतात. जास्त पावसामुळे रस्त्यावर येणाऱ्या जोरदार पाण्यामुळे दळणवळण आणि संपर्क काही काळ खंडित होतो. ह्या पार्श्वभूमीवर खैरगाव ते शेणवड बुद्रुक रस्त्यावर छोटा पूल बांधण्यात आला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपसभापती विठ्ठल लंगडे, उपसरपंच कैलास कडू यांच्या प्रयत्नांनी हे काम पूर्ण झाले आहे. सुरू असलेल्या जोरदार पावसाचे पहिलेच पाणी पुलाच्या खालून गेले. ह्यामुळे दोन्ही बाजूकडील नागरिकांना आता समस्या उदभवणार नाही. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. इगतपुरी पंचायत समितीच्या इवद उपविभागाने जिल्हा परिषदेच्या निधीतून पुलाचे चांगले काम केले असल्याबाबत उपसरपंच कैलास कडू आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. ह्या रस्त्यावर पहिल्या पावसाळ्यातील पुलाचे चित्र पाहून छोटा पुल बांधण्याचे सार्थक झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.